President Of Kalaranga Sanskrutik Samajik Sanstha
हा मी असाच…..!
हा मी असाच…..! मी प्रकल्प बाबू वाणी… रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील फोफेरी गावचा… लहानपणापासून T.V , सिनेमा.. नाटकाच वेड….! मी जातीने वाणी.. पंचक्रोशीत कुठे पडद्यावर पिक्चर… एखाद्या गावात नाटक… किंवा शाळांच्या गॅदरींग.. अशा प्रत्येक ठिकाणी बाबा.. किंवा भाऊ चणे फुटण्याचे दुकान घेऊन जायचे… मग त्यांच्या सोबत मी ही जायचो… यातूनच नाटक चित्रपटा बदल विशेष आकर्षण निर्माण झाल….. पाचवीला असताना पहिल्यांदा गॅदरींग साठी वीणा पाटील या मॅडम नी मला नाटकात संधी दिली… अन तेव्हापासुन हे नाटक – बिटक करायच वार माझ्या अंगात घुसल….. दहावीला असताना शाळेच्या निरोप समारंभात एक मीच लिहिलेली मोडकी तोडकी कविता सादर केली.. शिक्षकांनी कौतुक केल… तिथे “ आपण लिहू पण शक्यतो “.. हा शोध लागला.. मग पुढे J.S.M कॉलेज अलिबाग…, N.S.S कॅम्प…, युथ फेस्टिवल ते प्रयास सांस्कृतिक मंडळ, अलिबाग… या सर्वा च्या जडण घडणीतून… मी मला नव्याने भेटत गेलो…. माझे नाट्य गुरू स्वर्गीय विजय दादा बारसे… यांच्या तालमीत मी घडलो शिकलो… नेहरू युवा केंद्र सारख्या शासकीय उपक्रमाने सामाजिक कामाची गोडी लावली… माझ्यातील आत्मविश्वास…. नेतृत्व गुण भक्कम केला…. या साठी प्रत्येक वळणावर भेटलेल्या सर्व गुरुजनान चा मी ऋणी राहीन.. अलिबाग शहरातल्या या सार्या धडपडीत… माझ्याच सारखे समविचारी मित्र मला भेटले… अन त्यांच्या सोबतीने स्थापन झाली…. कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था….! 9 / 09 / 2009 साली संस्थेची नोंदणी केली….तेव्हा लावलेला हे रोपटं माझ्या मित्र परिवाराच्या सहकार्याने बहरत गेल… आज रायगड जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक विभागात काम करणारी संस्था.. कलारंग NGO म्हणुन आकारास येत आहे… सदर संस्थे चा अध्यक्ष म्हणुन मला त्याचा अभिमान आहे… कलारंग वेगवेगळया विभागात कार्यरत आहे.. सामाजिक विभाग , नाट्य निर्मिती , प्रोडक्शन हाऊस , टुरिझम, प्रशिक्षण शिबीर, अन याच बरोबर कलारंग लोक कलापथक म्हणुन जनजागृतीपर पथनाट्य साठी सरकार दरबारी स्वतः ह्याची विशेष ओळख निर्माण केली आहे. तरुणाई च्या डोक्यात सृजनतेचा विचार… व हातात सकारात्मक कार्य कुशलता निर्माण करणे हेच कलारंग चे स्वप्नं घेऊन माझा हा प्रवास असाच कायम चालू राहो हीच देवाकडे प्रार्थना.
प्रकल्प बाबू वाणी