आमदार महानाट्यकरंडक 2025 ची घोषणा

कलारंग संस्था आयोजित “ गौरव नाट्य कलेचा या सन्मान सोहळ्यात “ गावा - गावातील नाटक मंडळांचा भरघोस प्रतिसाद.

अलिबाग दिनांक जागतिक रंगभूमी दिनानिमित्त क ला रंग संस्थेच्या वतीने “ गौरव नाट्यकलेचा “ सन्मान सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले… या मध्ये गावा गावात नाटक करणार्‍या नाटक मंडळाना सन्मानित करण्यात आले असून… गावातील नाट्य परंपरा या विचारावर चर्चा सत्र घेण्यात आले… गावातील नाटक कलाकार यांनी भरघोस प्रतिसाद दिला..

या वेळी प्रमुख उपस्थिती मा. श्री. शामनाथ पुंडे नियामक मंडळ सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई , सौ. स्नेहा आंब्रे नाट्य निर्मात्या व अध्यक्ष स्पंदन नाट्य संस्था श्री. राजा अत्रे जेष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक , नीलम हजारे प्राचार्य विधी महाविद्यालय अलिबाग , संजीवनी नाईक शिवसेना - जिल्हा संपर्कप्रमुख , रंगकर्मी राजन पांचाळ, राजू गुरव, विजया कुडव , दिलीप बापट आदी मान्यवर उपस्थित होते…

Gallery

चला कलाकार घडवूया..,

नाट्य कलेचा वारसा जपूया ....!