"आमदार महानाट्य करंडक 2025" नियम व अटी
1 ) सदर नाट्य स्पर्धा ही अलिबाग तालुक्यातील ग्रामीण नाट्य मंडळाकरिता मर्यादित आहे
2 ) फक्त दोन अंकी मराठी नाटक स्पर्धेकरिता पात्र असेल
3 ) प्रत्येक अंक जास्तीत जास्त 50 मिनिटांचा असावा... 10 मिनिटांचा मध्यंतर असेल.... मध्यंतरा सहित नाटक 2 तासांच्या वर नसावे
4 ) नाटकातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ हे ग्रामीण भागातीलच असावेत तसेच एका कलाकारांला फक्त एका नाटकातच सहभागी होता येईल.
5 ) नाट्य प्रयोग सादरीकरणाची सर्व जबाबदारी ही त्या त्या नाट्य मंडळाची असेल... आयोजकांकडून रंगमंच व वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल
6 ) सदर आमदार महानाट्य करंडक करिता 10 हून अधिक नाट्य मंडळाच्या प्रवेशिका आल्या तर तालीम स्वरुपात प्राथमिक फेरी घेतली जाईल व त्या तून अंतिम फेरी करिता नाटकाची निवड केली जाईल.
7 ) तसेच 3 हून अधिक प्रवेशिका न आल्यास स्पर्धा रद्द केली जाईल
8 ) स्पर्धे त प्रवेश निश्चित करण्यासाठी ऑन लाइन प्रवेश अर्ज भरणे गरजेचे आहे.
17 एप्रिल 2025 ही प्रवेशासाठी शेवटची तारीख असेल
9 ) २५०० /- ईतकी अनामत रक्कम संस्थेच्या खात्यात जमा केल्यानंतरच आपला प्रवेश नक्की केला जाईल... स्पर्धेत प्रयोग सादरीकरणा नंतर अनामत रक्कम परत केली जाईल.... कोणत्या ही कारणास्तव प्रयोग न झाल्यास रक्कम परत दिली जाणार नाही
10 ) सदर स्पर्धेच्या नियम व अटी मध्ये बदल करणेचा अधिकार आयोजकांना राहील... तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
स्पर्धेचे ठिकाण : भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय अलिबाग.
स्पर्धा ११ मे ते १५ मे २०२५ ह्या कालावधीत पार पडेल.
अधिक माहिती साठी संपर्क
रितेश घासे
7888041384
संदेश मयेकर
8698000515